-->

How to Study for MSBTE Exams | How to clear MSBTE Backlog Exam?

 नमस्कार मित्रानो या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की How to Study for MSBTE Exam किंवा How to clear MSBTE Backlog Exam. ही पोस्ट जर तुम्ही शेवटपर्यंत नीट वाचली आणि दिलेल्या स्टेप्स follow केल्या तर तुम्ही कोणतीही MSBTE diploma exam पास करू शकाल. ही पोस्ट लिहण्याचं कारण असं की आम्हाला गेली काही दिवस आमच्या इंस्टाग्राम पेज वर म्हणजेच diplomachakhazana.in वर खूप मेसेज येत होते की आम्हाला  डिप्लोमा ची परीक्षा कशी पास करावी ते समजतं नाहीये अनेक मुलांना/मुलींना बॅकलॉग आहे त्याचा अभ्यास कसा करावा हे त्यांना समजत नाहीये खास करून first इयर च्या विध्यार्थ्यांना विषय नक्की कसे काढायचे ते माहिती नसते म्हणून आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला त्या बद्दल चं सांगणार आहोत व परीक्षे साठी लागणारे MSBTE Study Material Sorted Branch Wise कुठे मिळेल ते देखील सांगणार आहोत.

how-to-study-and-prepare-for-msbte-exam, how-to-clear-msbte-backlog-exam

सुरु करण्याअगोदर तुम्हाला सांगायचे आहे की डिप्लोमाचाखजाना हे पेज आणि वेबसाईट आम्ही डिप्लोमा च्या विध्यार्थ्यांना मदत करण्यासाठीच चालु केले होते आम्ही ही डिप्लोमा पास आऊट चं विद्यार्थी आहोत डिप्लोमा करत असताना अनेकजनांना बॅकलॉग लागतात त्या प्रमाणे ऍडमिन ला देखील बॅकलॉग लागले होते परंतु ऍडमिन नी एकाच वेळी 8 विषय कसे काढले त्या बदल यात ऍडमिन तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही देखील तोच फॉर्मुला वापरला तर तुम्ही देखील चांगले मार्क मिळवू शकता आणि बॅकलॉग असेल तर तो काढू शकता.

MSBTE चा कोणताही विषय काढण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स follow करा

1. Download MSBTE Syllabus I Scheme pdf

मित्रानो तुम्हाला जो विषय काढायचा आहे किंवा ज्यात तुम्हाला स्कोर करायचा आहे त्याची pdf तुम्ही सर्वात अगोदर download करा, या pdf डाउनलोड करण्यासाठी तुम्ही main menu मध्ये जाऊन  तुमच्या ब्रांच वर क्लिक करा आणि syllabus या ऑपशन वर क्लिक करा विध्यार्थ्यांना या pdf चे महत्व माहिती नाही किंवा समजत नाही अनेक जण या pdf चा वापर फक्त unit कोणते आहेत किती आहेत ते बघायला वापर करतात परंतु या pdf मध्ये तुम्हाला कोणत्या unit ला किती मार्क्स आहेत ते देखील समजते. कोणत्या unit ला किती मार्क्स आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं असत कारण मग तुम्ही ज्या unit ला सर्वात जास्त मार्क्स आहेत त्या वर जास्त focus करू शकता आणि हिच आपली पहिली स्टेप आहे की ज्या त्या विषयाचा syllabus डाउनलोड करून ठेवा आपल्या वेबसाईट वर syllabus च्या pdf उपलब्ध आहेत.

2.Download MSBTE Model Answer Paper I Scheme pdf.

विध्यार्थ्यानो दुसरी आणि सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे मॉडेल answer पेपर. तुम्हाला मॉडेल answer पेपर काय असतो  आणि त्याचे फायदे काय आहेत ते अगोदर सांगतो जेणेकरून तुम्हाला त्याचे महत्व समजेल

  • मॉडेल answer पेपर म्हणजे नक्की काय?

मॉडेल answer पेपर म्हणजे तो पेपर जो तुमच्या सिनियर विध्यार्थ्यांना फायनल एक्साम साठी प्रश्न पत्रिका म्हणून आला होता ती प्रश्न पत्रिका MSBTE स्वतः solve करून प्रश्नाचे उत्तर त्यात टाकून पुन्हा तुम्हाला देते त्या मध्ये तुम्हाला हे देखील समजेल की किती मार्क्स साठी किती उत्तर लिहावं लागेल. त्या मुळे तुम्ही सर्वात अगोदर जितके जास्त मॉडेल answer पेपर डाउनलोड करता येतील तेवढे डाउनलोड करा हे पेपर आपल्या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहेत main menu मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.

मॉडेल answer पेपर डाउनलोड केल्या नंतर तुम्हाला ज्या unit ला सर्वात जास्त मार्क्स आहेत त्या unit मधले प्रश्न मॉडेल answer पेपर मध्ये शोधून ते लिहून पाठ करायचे आहेत तो प्रश्न किती मार्क्स साठी आला होता त्याच उत्तर किती दिलय त्याच निरीक्षण करा जितके जास्त मॉडेल answer पेपर तुम्ही रेफर कराल तितके जास्त प्रश्न आणि त्यांची उत्तर तुम्हाला सापडतील

सहाव्या सेम च्या विध्यार्थ्यांसाठी मॉडेल answer पेपर उपलब्ध नाहीत पण ते त्या सॅम्पल question पेपर रेफर करू शकतात

3. Download MSBTE Question Paper I Scheme pdf.

Practice makes man perfect हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल डिप्लोमा च्या परीक्षे साठी जर तुम्हाला सराव करायचा असेल तर MSBTE previous year question paper हे अतिशय महत्वाचे साधन आहे या प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारले जाऊ शकतात त्या मुळे तुम्ही या प्रश्न पत्रिका डाउनलोड करून जास्तीत जास्त प्रश्न पत्रिकेचा सराव करा. MSBTE I Scheme चा अगोदर आणि आताचा Syllabus सारखा असल्या मुळे प्रश्न repeat होण्याची शक्यता जास्त असते एका विषयाचे दोन किंवा तीन प्रश्न पत्रिका जरी तुम्ही सोडवल्या तरी तुम्ही तो विषय आरामात काढू शकतात. या प्रश्न पत्रिका तुमच्या सिनियर विद्यार्थ्यांना फायनल परीक्षेसाठी प्रश्न पत्रिका म्हणून आलेले असतात. हे पेपर आपल्या वेबसाईट वर देखील उपलब्ध आहेत main menu मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.

4. Download MSBTE Sample Question Paper I Scheme pdf

मित्रानो कोणत्याही विषयाची परीक्षा द्यायला जात असताना सर्वात अगोदर तुम्ही त्या विषयाचा सॅम्पल question पेपर सोडवला पाहिजे सॅम्पल question पेपर मुळे तुम्हाला कोणते प्रश्न किती मार्क साठी विचारले जातील ते कोणत्या प्रश्न क्रमांकात असतील त्याची माहिती मिळेल सॅम्पल question पेपर मुळे तुम्हाला पेपर पॅटर्न चांगल्या प्रकारे समजून येईल हे पेपर तुम्ही आपल्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकता त्या साठी तुम्ही main menu मध्ये जाऊन आपली ब्रांच निवडा आणि आणि त्या नंतर सॅम्पल question पेपर वरती क्लिक करा तुम्हाला तुमच्या ब्रांच wise पेपर डाउनलोड करता येतील.

5.परीक्षे च्या काळात सोशल मीडिया चा वापर टाळा

जर तुमच्यामध्ये परीक्षेच्या काळात सोशल मीडिया चे सर्व apps uninstall करायची ताकद असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही पण तुम्हाला जर इंस्टाग्राम, फेसबुक इत्यादी uninstall करू वाटात नसेल तर एक काम करा सोशल मीडिया साठी दिवसातून एक  किंवा अर्धा तास काढून ठेवा आणि फक्त त्याच वेळी सोशल मीडिया चा वापर करा ते बंद कधी करायचे यासाठी alarm लावून ठेवा कारण सोशल मीडिया वर आपलं वेळ कधी वाया जातो ते आपल्याला समजत नाही reels मुळे विद्यार्थ्यांचे रोज किती तरी तास वाया जातात आणि परीक्षेच्या काळात वेळ हा खूप महत्वाचा घटक आहे त्या मुळे शक्यतो सोशल मीडिया चा वापर टाळा किंवा कमी करा

आपण जर वरी दिलेल्या ५ स्टेप्स नीट follow केल्या तर तुम्हाला नक्कीच परीक्षेत चांगले मार्क्स मिळतील आणि जर विषय बॅक असेल तर तो क्लिअर होई। 

नोट - 

विध्यार्थी मित्रानो आपण डिप्लोमाचाखजाना वेबसाईट वरून MSBTE Lab Manuals I Scheme Pdf देखील डाउनलोड करू शकता manuals डाउनलोड करण्यासाठी मेन मेनू मध्ये जाऊन तुम्ही तुमची ब्रांच निवडा आणि त्या नंतर लॅब मॅनुअल्स वरती क्लिक करा डिप्लोमा च्या विध्यार्थ्यांना लागणारे सर्व महत्वाचे पेपर आणि इत्यादी गोष्टी आपल्या वेबसाईट वर उपलब्द आहेत तुम्ही आपल्या वेबसाईट वरून MSBTE mcq pdf with answers देखील डाउनलोड करू शकता 

डिप्लोमा चा खजाना बदल थोडी माहिती :-

आम्ही डिप्लोमा च्या फायनल इयर ला असताना ठरवले की डिप्लोमा च्या विध्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचे आपल्या कडून त्यांना मदत झाली पाहिजे विध्यार्थ्यांना notes, mcq मिळाले पाहिजेत अनेक विध्यार्थी क्लास ची फीस भरू शकत नाही त्यांना अभ्यास करण्यासाठी काहीच कमी पडू नये हा आमचा उद्देश होता त्या मुळे आम्ही डिप्लोमा चा खजाना वेबसाईट आणि इंस्टाग्राम पेज चालु केले आज आमच्या सोबत हजारो विध्यार्थी जोडले आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही आता पर्यंत भरपूर विध्यार्थ्यांना मदत करू शकलोय 2020 ला परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय सरकार ने घेतला तेव्हा आम्ही सर्व विध्यार्थ्यांकडून mcq collect केले आणि वेबसाईट वर upload करून अनेक विध्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले त्या मुळे अनेक विध्यार्थ्यांना मदत झाली. या पुढे देखील आमचं हेच ध्येय असेल की जास्तीत जास्त विध्यार्थ्यांना मदत कशी करता येईल.

Conclusion:-

वरील स्टेप्स आपण जर follow केल्या तर आपण कोणताही विषय काढू शकतो व त्या विषयात चांगले मार्क्स मिळवू शकतो डिप्लोमा चा खजाना कडून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या शुभेच्छा!

1 Comments

  1. Thank u sir it is very helpful information for all students...
    👍

    ReplyDelete

Please feel free to comment. Being diploma students We are always ready to help diploma Students