-->

MSBTE LATEST GR | MSBTE EXAM FORMS | diplomachakhazana

 नमस्कार विध्यार्थ्यांनो,

आपल्या सर्वांना माहितच आहे की MSBTE EXAM FORM  सुरु झाले आहेत. एक्साम फॉर्म ची फीस 600 आहे

MSBTE latest gr



कोरोना मुळे सर्व कॉलेज हे ऑनलाईन शिकवत आहेत आणि तरी देखील विद्यार्थ्यांकडून पूर्ण फीस आकारली जात आहे


कोरोना मुळे अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती खालवली आहे आणि त्यांना कॉलेज ची फीस भरणे सध्या शक्य नाही, परंतु अनेक कॉलेज नी परीक्षा फॉर्म सुरु होताच असा नियम जाहीर केला की

ज्या विध्यार्थ्यानी पूर्ण फीस भरली नाही त्यांना परीक्षा फॉर्म भरता येणार नाही किंवा परीक्षा फॉर्म भारत असताना कॉलेज ची पूर्ण फीस भरलेली असावी


अश्या कॉलेज साठी MSBTE ने 4/5/21 रोजी एक नवीन GR जाहीर केला आहे त्यात MSBTE ने अस सांगितलं आहे की


उपरोक्त संदर्भिय परिपत्रकान्वये उन्हाळी परीक्षा २०२१ करीता विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज भरुन घेण्याचे व निश्चित करण्याचा कालावधी कळविण्यात आलेला आहे. त्यानुसार दि. ३ मे २०२१ पासून परीक्षा अर्ज स्विकृती सुरु झालेली आहे.. तथापि असे निदर्शनास आले आहे की. शैक्षणिक शुल्काच्या कारणास्तव काही संस्था विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरुन घेण्यामध्ये अडचणी निर्माण करीत आहेत. परीक्षा अर्ज विहित कालावधी न भरल्यास विद्यार्थ्यांचे दिर्घकालीन शैक्षणिक नुकसान होऊ शकते.


सदर बाब विचारात घेऊन आपल्या संस्थेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा २०२१ चे परीक्षा अर्ज विहित कालावधीत भरुन घेतले जातील याची खबरदारी संस्था प्रमुखांनी घ्यावी. तसेच आपल्या संस्थेतील एकही पात्र विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास, विद्यार्थ्यांच्या होणा-या शैक्षणिक नुकसानास संस्था प्रमुख म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घेण्यात यावी.


 वरील GR वरून लक्षात येते की MSBTE नी सर्व कॉलेज च्या प्राचार्य वर्गाला विनंती केली आहे की विध्यार्थ्यांना फीस ची सक्ती करू नये आणि विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरून घ्यावेत एक ही विध्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिल्यास त्या विध्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानस प्राचार्य जबाबदार  राहणार 

TO DOWNLOAD GR CLICK HERE

0 Comments