-->

SPPU GR 16/03/21 | diplomachakhazana | SPPU | ENGINEERING



कोव्हिङ-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्भूमीवर विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्याच्य्यांच्या ऑक्टोबर / मोव्हेंबर, २०२० या परीक्षांचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन करण्यात येत आहे. याचायतची मार्गदर्शक तत्वे व सूचना खालीलप्रमाणे आहेत.


१. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबर /नोव्हेंबर, २०२० सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन पध्दतीने परीक्षांचे नियोजन दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून करण्यात आले आहे. या परीक्षा फक्त Online बहुपर्यायी प्रश्नाव्दारे (MCQ), एक तासाची परीक्षा अशा पध्दतीने घेण्यात येतील. Online पध्दतीने होणा-या बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरुपाच्या परीक्षा हया ५० गुणांच्या ६० मिनिटे ( एक तास) कालावधीच्या राहतील. यासाठी ६० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिले जातील त्यामधून ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राहय धरण्यात येतील.


२. या परीक्षांकरिता बहुताश अभ्यासक्रमांमधीलन (Programmes) पाठयक्रम (Syllabus) १०० टक्के पूर्ण झाला असल्याने त्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा हया १०० टक्के पाठयक्रमांवर होतील. तसेच बी.ए.., बी.काॉमहे वार्षिक अभ्यासक्रम व बहिःस्थ यांच्याही परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमांवर होतील.


३. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शेक्षणिक वर्ष २०२०-२१ चे प्रथम सत्र दिनांक ६ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु झालेले आहे. जसे की, प्रथम सत्र वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, विधी, एम.एड. एम.पी.एड. बीएस्सी-बी.एड, बी.ए. बी.एड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा संबंधित अभ्यास मंडळांकडून प्राप्त सूचनेनुसार प्रथम घटकापासून (युनिट) सुरु होणा-या ७० टक्के अभ्यासक्रमावर होतील.


४. प्रथम सत्राच्या परीक्षांसाठी फक्त लेखी परीक्षांचे (Theory Papers) गुण विद्याच्य्यांना Students Profile System मार्फत उपलब्ध करुन दिले जातील. नजिकच्या कालावधीमध्ये संबंधित विद्याच्थ्याचे टण्पयाटण्याने निकाल जाहीर होतील. त्या निकालाच्या अनुषंगाने टण्प्याटण्याने मार्च/एप्रिल, २०२१ परीक्षेसाठी परीक्षा आवेदनपत्र उपलब्ध करुन दिले जातील. तथापि, ऑक्टोचर / नोव्हेंबर, २०२० व मार्च/एप्रिल, २०२१ या परीक्षांची गुणपत्रके/श्रेयांक पध्दतीने एकत्रि्तरित्या तर वितरीत केली जातील. 

५ . खाली नमूद केलेल्या प्रथम वर्षाच्या अनुशेषित/नियमित (असल्यास) अभ्यासक्रमांच्या परीक्षा महाविद्यालय/परिसंस्था स्तरावर आयोजित करण्यात याव्यात. 

कला              B.A.2013


वाणिज्य          B.B.A. (Computer Application) 2016 B.B.A. (International Business) 201

                        B.B.M. (International Business) 2013

                        B.B.A. (Revised 2013) 

                        B.Com. 2013


विधी                 B.A.LL.B.(Rev.2017)

                        LL.B.(Rev.2017)


विज्ञान                B.Sc.(Biotech) 2013

                           B.Sc. (Animation) 2016

                            B.C.A. (Science) 2016

                            B.Sc. (Computer Science) 2013 B.Sc. HS (2017)

                            B.Sc. Regular 2013


अभियांत्रिकी           M.E.(All Elective Subjects)

उपरोक्त परीक्षांचे आयोजन केंद्र व राज्य शासनाने शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन ऑनलाईन/ऑफलाईन (जसे शक्य होईल तसे) पध्दतीने बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरुपाच्या परीक्षा या ५० गुणांच्या ६० मिनिटे (एक तास) कालावधीच्या दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून महाविद्यालय परिसंस्था स्तरावर आवश्यक त्या उपलब्ध सुविधांचा वापर करुन करण्यात यावे, यासाठी ६० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिले जातील त्यामधून ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राहय धरण्यात यावेत. या परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालय परिसंस्था यांचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावे व याबाबतचा सविस्तर तपशील परीक्षा-समन्वय कक्षास सादर करण्यात यावा. तसेच यामधील अनुशेषित व नियमित परीक्षार्थीचे पेपर एकाच दिवशी येणार नाहीत याची संपूर्ण काळजी महाविद्यालय परिसंस्था यांनी घ्यावी. 


६.इन-सेमिस्टर, ऑनलाईन, सेशनल परीक्षा (लेखी परीक्षेच्या विषयांसाठी व अभियांत्रिकी अध्यासक्रमातील Fundamentals of Programming Languages या विषयांसाठी) महाविद्यालय परिसंस्था स्तरावर उपलब्ध सुविधांचा वापर करुन घेण्यात याव्यात, याबाबतचे वेळापत्रक महाविद्यालय परिसंस्था स्तरावर निश्चित करुन त्यानुसार विद्यार्थ्यांना अवगत करण्यात यावे, इंटरनल मार्कस, वेब पोर्टल सुविधा वापरुन विद्यार्य्यांना या परीक्षांत मिळालेले गुण विद्यापीठाकडे दिनांक १० एप्रिल, २०२१ पर्यंत पाठविण्यात यावेत.


७.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रथम ते व्दितीय सत्रासाठी एकत्रितरीत्या प्रात्यक्षिक, मोखिक, सेमिनार, मिनी प्रोजेक्टस, प्रोजेक्ट्स व डेझरटेशन परीक्षांचे आयोजन ल्या त्या अभ्यासक्रमालीन विद्याथ्यांच्या प्रथम सत्राच्या दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून सुरु होणा-या विद्यापीठाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर, २०२० परीक्षांच्या शेवटच्या पेपरनंतर लगेचच ऑनलाईन ऑफलाईन पध्दतीने करण्यात यावे. त्याकरिता वेगळे परिपत्रक निर्गमित केले जाणार नाही. या प्रात्यक्षिक व इतर उल्लेखित परीक्षांचे गुण त्वरीत इंटरनल मार्कस वेबपोर्टल सुविधा वापरुन भरण्यात यावेत. कुठल्याही प्रात्यक्षिक, मौखिक, सेमिनार, मिनी प्रोजेक्टस्, प्रोजेक्ट्स व डेझरटेशन परीक्षांकरिता परीक्षा विभागाकडून बहिःस्थ परीक्षकांच्या नेमणूका अथवा महाविद्यालयांकरिता वेगळे वेळापत्रक पाठविले जाणार नाही. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रांच्या ऑनलाईन परीक्षा पूर्ण झाल्यावर लगेचच मा.प्राचार्य/संचालक यांनी महाविद्यालय स्तरावर परीक्षकांच्या नेमणुका करुन परीक्षांचे आयोजन करावे, या परीक्षांचे गुण इंटरनल मार्कस वेबपोर्टल सुविधा वापरुन भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. फक्त एम.सी.ए.य एम.बी.ए. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रात्यक्षिकांसाठी बहिःस्थ पर्यवेक्षक विद्यापीठाकडून नेमण्यात येतील.


८ . ऑक्टोबर नोव्हेंबर, २०२० च्या परीक्षांचे वेळापत्रक दिनांक २५ मार्य, २०२१ पर्यंत विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल. या परीक्षा निर्धारीत वेळेत पूर्ण होणे अनिवार्य असल्यामुळे विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार विशेष बाब म्हणून बहुपर्यायी परीक्षांचे सर्व रविवारच्या दिवशीही करण्यात आलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी.


९ . प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्याथ्याच्या ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत आवश्यक ती सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेलव्दारे अवगत करण्यात येईल. मात्र यासाठी विद्याच्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे.

१०. Online परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे ही सेव्ह होऊन खंड पडल्यास तेथून परीक्षा पुन्हा सुरु होईल.

११. Online परीक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी सर्वसाधारण प्रश्नांवर आधारीत सराव परीक्षांचे आयोजन  (Mock Test/Practice Test) मुख्य परीक्षेपूर्वी दिनांक ७ एप्रिल, २०२१ पासून करण्यात येईल व तसे सर्व संबंधितांना अवगत करण्यात येईल.

१२. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोयी व सवलती देय राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी २० मिनिटे अधिकचा वेळ देय राहील.

१३. १३. Online पध्दतीने होणा-या बहुपर्यायी प्रश्न (MCQ) परीक्षांसाठी छायाकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही.

१४. ज्या महाविद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर, ऑनलाईन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दिनांक १० एप्रिल, २०२१ पर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फक्त ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येतील व गुणपत्रके मार्च/एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे निकालाबरोबरच एकत्रित वितरीत करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

१५. विद्यापीठ अधिकार मंडळाने मान्य केलेल्या परीक्षा आराखड्यानुसार विद्यार्थ्यांच्या संबंधित परीक्षेसाठी गुणांचे रुपांतरण केले जाईल. उदा. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी परीक्षा आराखडयानुसार ७० गुणांची परीक्षा आहे. या अभ्यासक्रमांचे विद्यार्थी आक्टोबर/नोव्हेबर, २०२० ची ऑनलाईन पध्दतीने ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारीत परीक्षा देतील, या परीक्षेत ५० पैकी विद्यार्थ्यास मिळालेले गुण गणितीय सूत्र वापरुन ७० गुणांपैकी मिळालेल्या गुणांत रुपांतरित केले जातील.

१६. परिपत्रक क्र.१२५ अंतर्गत येणा-या अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे नियोजन महाविद्यालय स्तरावर विद्यापीठाच्या परीक्षांच्या नियोजनाच्या धर्तीवर करण्यात यावे. स्वायत्त महाविद्यालय /संस्थांनी सर्व नियमांचे अनुपालन करुन परीक्षा घेण्यात याव्यात.

                                  उपरोक्त परीक्षांचे आयोजन केंद्र व राज्य शासनाने शासनाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्याची संपूर्ण काळजी घेऊन ऑनलाईन/ऑफलाईन (जसे शक्य होईल तसे) पध्दतीने बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरुपाच्या परीक्षा या ५० गुणांच्या ६० मिनिटे (एक तास) कालावधीच्या दिनांक १० एप्रिल, २०२१ पासून महाविद्यालय/परिसंस्था स्तरावर आवश्यक त्या उपलब्ध सुविधांचा वापर करुन करण्यात यावे. यासाठी ६० बहुपर्यायी प्रश्न (MCQ) दिले जातील त्यामधून ५० प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राहय धरण्यात यावेत. या परीक्षांचे वेळापत्रक महाविद्यालय परिसंस्था यांचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावे व याबाबतचा सविस्तर तपशील परीक्षा समन्वय कक्षास सादर करण्यात यावा. तसेच यामधील अनुशेषित व नियमित परीक्षार्थीचे पेपर एकाच दिवशी येणार नाहीत याची संपूर्ण काळजी महाविद्यालय परिसंस्था यांनी घ्यावी.

१७. सदर परीक्षांच्या आयोजनापूर्वी व परीक्षेदरम्यान येणा-या अडचणी व शंकांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी sps.unipune.ac.in मध्ये लॉगीन करुन आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या संबंधित महाविद्यालय/परिसंस्थेमध्ये संपर्क साधावा.

0 Comments