पुणे विध्यापीठाच्या परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने होणार!
करोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंतिम सत्रातील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन परीक्षेचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत वाढला आहे, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. जवळपास २० ते २५ टक्क्यांनी ऑनलाइन परीक्षेचा निकाल वाढला आहे.
पुणे विध्ययपीठाच्या प्रथम सत्राच्या 15 मार्च ला आयोजित केलेल्या परीक्षा आता 11 एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
पुणे विद्यापीठाने ११ एप्रिलपासून प्रथम सत्र परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ही ऑनलाइन परीक्षा पुणे विद्यापीठाची एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन प्रा. लि. ही कंपनी घेणार असल्याचे निश्चीत झाले आहे. विद्यापीठाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेतली; पण त्यामध्ये प्रॉक्टर्ड मेथड नसल्याने विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते.
बॅकलॉगच्या परीक्षेत विद्यापीठाने प्रॉक्टर्ड मेथडने विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवले. त्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या ११ जणांवर कारवाई केली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रथम सत्र परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे (एआय) प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करणार आहे. यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारपणे १२ वेळा इशारा देऊन परीक्षा बंद केली जाईल. तसेच परीक्षा सुरू होण्यापूर्वी आठवडाभर आधी सराव चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांसाठी 50 गुणांसाठी एकाधिक निवड प्रश्नांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल.
प्रथम सत्र परीक्षेसाठीही प्रॉक्टर्ड मेथडचा वापर करताना 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'चा वापर केला जाईल. त्यामध्ये सुमारे १२ वेळा संधी दिली जाणार असून, यामध्ये प्रत्येक ३० सेकंदांनी मोबाईल स्क्रीनचा फोटो काढला जाईल. अल्गोरिदममध्ये या सर्व फोटोचे विश्लेषण करून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याने गैरप्रकार केला हे स्पष्ट होऊ शकेल. त्यानुसार विद्यापीठातर्फे पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत सुमारे 5.84 lakh लाख विद्यार्थ्यांनी सर्व शाखांमध्ये परीक्षा फॉर्म भरले आहेत. परीक्षा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १० मार्चपर्यंत होती. विद्यापीठाच्या सेमिस्टर १ चा निकाल व्यावहारिक परीक्षेच्या निकालासह विद्यार्थ्यांना दिला जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा सेमेस्टर II च्या शेवटी घेण्यात येईल आणि दोन्ही सत्रांचे निकाल किंवा मार्कशीट मुदतीच्या शेवटी दिले जाईल.
सेमिस्टर 1 च्या परीक्षा postpone झाल्यामुळे काही अधिकाऱ्यांचे असे मत आहे की द्वितीये सेमेस्टर च्या परीक्षीय देखील postpone होतील या बद्दल अजून कोणतेही GR आलेले नाही.
sppu च्या सर्व updates मिळवण्यासाठी ब्लॉग ला subscribe करा!
0 Comments
Please feel free to comment. Being diploma students We are always ready to help diploma Students